Pune Traffic Police Extended Info You Should Know

Pune Traffic Police Extended Info You Should Know

SMS Service (Direct by Mobile)::SMS      “JOIN PTP”      to     09219592195
SMS      “LEAVE PTP”    to     09219592195

You Get Instant Free Traffic Updates on Your Mobile.Frequently Asked Questions:Frequently Asked Questions.

1. ड्रायव्हींग लायसन्स, वाहन कर, परमीट, वाहन नोंदणीचे अधिकार :-
 ज्या त्या कार्यक्षेत्रातील प्रादेशिक परिवहन विभाग (R.T.O.) पुणे / पिंपरी चिंचवड.
संपर्काकरीता Related links:
प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे. www.rtopune.info
प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी चिंचवड. www.mahatranscom.in

2. रस्ते दुरूस्ती, फुटपाथ, पादचारी सुविधा पुरविणे, रस्ते, फ्लायओव्हर बांधणी, सब – वे बांधणी, रोड मार्कींग करणे, सूचना फलक बसविणे, सिग्नल बसविणे, त्याची दुरूस्ती व देखभाल करणे, रस्ते दुभाजक बसविणे, ट्रॅफीक आयलॅन्ड तयार करणे इत्यादी :-
 पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड व  राष्ट्रीय महामार्गावरील अशा कामांकरीता नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया
संपर्काकरीता Related links:
पुणे महानगरपालिका. www.punecorporation.org,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका. www.pcmcindia.in
पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड. ÷www.punecantonmentboard.com
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड. www.cbkirkee.org.in:8080
नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया. www.nhai.org     (email : pune1@nhai.org)

3. स्ट्रीट लाईट :-
 पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड व  राष्ट्रीय महामार्गावरील अशा कामांकरीता नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया
संपर्काकरीता Related links:
पुणे महानगरपालिका. www.punecorporation.org,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका. www.pcmcindia.in
पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड. ÷www.punecantonmentboard.com
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड. www.cbkirkee.org.in:8080
नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया. www.nhai.org     (email : pune1@nhai.org)

4. वृक्ष तोड परवानगी :-
 पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड व  राष्ट्रीय महामार्गावरील अशा कामांकरीता नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया
संपर्काकरीता Related links:
पुणे महानगरपालिका. www.punecorporation.org,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका. www.pcmcindia.in
पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड. ÷www.punecantonmentboard.com
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड. www.cbkirkee.org.in:8080
नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया. www.nhai.org (email : pune1@nhai.org)

5. सांडपाणी व्यवस्था :-
 पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड व  राष्ट्रीय महामार्गावरील अशा कामांकरीता नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया
संपर्काकरीता Related links:
पुणे महानगरपालिका. www.punecorporation.org,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका. www.pcmcindia.in
पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड. ÷www.punecantonmentboard.com
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड. www.cbkirkee.org.in:8080
नॅशनल हायवे अॅथॉरीटी ऑफ इंडीया. www.nhai.org     (email : pune1@nhai.org)

6. सिग्नल मेंटेनन्स एजन्सी :-
 पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये –
1) न्युक्लीऑनीक्स ट्रॅफीक सिग्नल सिस्टीम्स – 020 / 24226396, 24226641
2) केल्ट्रॉन – 020/24218431
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यक्षेत्रामध्ये-
1) आय.टी.आय. – 020 / 25811683, 25824518

पुण्यामध्ये ड्रायव्हींग लायसन्स कुठे मिळू शकते ?
पुणे जिंल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे, प्रादेशिक परिवहन विभाग, पिंपरी चिंचवड व प्रादेशिक परिवहन विभाग, बारामती या कार्यालयामध्ये विहीत नमुन्यामध्ये अर्ज करून चाचणी प्रक्रीया पार पाडल्यानंतर ड्रायव्हींग लायसन्स मिळू शकते.
संपर्काकरीता Related links:
प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे. www.rtopune.info
प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी चिंचवड. www.mahatranscom.in

ड्रायव्हींग लायसन्स मिळविण्याकरीता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
1. तीन पासपोर्ट साईझ फोटो (सहा महिन्याचे आतील)
2. पत्त्याचा पुरावा :- मतदार यादीचा उतारा / इलेक्ट्रीक बील / आयकर विवरणपत्र / दूरध्वनी बील / विमा पॉलीसी / पासपोर्ट / इलेक्शन कार्ड
3. वयाचा दाखला :- जन्माचा दाखला / शालान्त परीक्षा दाखला / पासपोर्ट / शाळा सोडल्याचा दाखला / विमा पॉलीसी
• वरील पुराव्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी स्वाक्षांकीत केलेल्या प्रती आवश्यक आहेत.
• 16 ते 18 वयोगटातील मुला / मुलींसाठी त्यांचे पालकांनी संबंधित परिवहन अधिकाऱ्यासमोर समक्ष स्वाक्षरी करून संमती देणे आवश्यक आहे.
संपर्काकरीता Related links:
प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे. www.rtopune.info
प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी चिंचवड. www.mahatranscom.in

वाहन चालविताना वाहन चालकांनी कोणती कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे ?
1. मूळ ड्रायव्हींग लायसन्स
2. वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट
3. टॅक्स सर्टीफिकेट
4. पी.यु.सी. प्रमाणपत्र
5. इन्श्युरन्स सर्टीफिकेट
6. फीटनेस सर्टीफिकेट व परमीट (ट्रान्सपोर्ट वाहनांकरीता)

सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे काय ?
वाहन चालु स्थितीमध्ये असताना वाहन चालक व त्याचे शेजारील व्यक्तीने सीटबेल्टचा वापर करणे सेंट्रल मोटर व्हेइकल रूल्स, 1988 चे नियम 138 प्रमाणे बंधनकारक आहे. सन 1995 नंतरच्या प्रत्येक वाहनांकरीता उत्पादकांनी सीटबेल्ट पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टींटेड ग्लासकरीता नियम काय आहे ?
केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989च्या नियम क्र. 100(2)मध्ये त्याबाबत तरतूद करण्यात आली असून त्याप्रमाणे ‘प्रत्येक मोटर वाहनाचा विंड स्क्रीन किंवा खिडकी यांची काच अशी असली पाहिजे आणि अशा स्थितीत ठेवली पाहिजे की, त्यामधून 70 टक्क्यांपेक्षा जास्त दृश्य स्वरूपातील उजेड आत आला पाहिजे. बाजूच्या खिडक्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या काचा अशा असाव्यात आणि अशा स्वरूपात ठेवण्यात याव्यात की, 50 टक्क्यांपेक्षा कमी नसेल इतका दृश्य स्वरूपातील उजेड आत आला पाहिजे. तसेच त्या भारतीय मानकांशी (आय.एस.:(भाग 2)शी) जुळणाऱ्या असल्या पाहिजेत.’

कायद्यानुसार वाहनांचा लाईट  कशाप्रकारे असावा ?
1. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 104 (1) नुसार दुचाकी व तीन चाकी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना मागील बाजूला प्रत्येक बाजुला एक असे दोन लाल रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे.
2. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 102 (अ) नुसार सर्व प्रकारच्या वाहनांना अंबर (पिवळ्या) रंगाचा इंडीकेटर असणे अनिवार्य आहे.
3. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 102 (ब) नुसार दुचाकी व्यतिरीक्त सर्व प्रकारच्या वाहनांना मागील बाजूला दोन्ही बाजूस व दुचाकी वाहनांना मध्यभागी एक लाल रंगाचे टेल लॅम्प / स्टॉप लॅम्प / ब्रेक लाईट अनिवार्य आहे.
4. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 109 नुसार 500 सी.सी.पेक्षा अधिक क्षमता नसेल अशी तीन चाकी वाहने व दुचाकी वाहने वगळून प्रत्येक वाहनांला पुढील बाजूस दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक असा पांढरा किंवा अंबर रंगाचा दिवा व वाहनांचे पाठीमागील बाजूस प्रत्येक बाजूला एक असे दोन लाल रंगाचे पार्कींग दिवे असणे अनिवार्य आहे.
5. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 111 नुसार नोंदणी प्राधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेशिवाय प्रखर प्रकाशझोत टाकणारा दिवा किंवा सर्चलाईट कोणत्याही वाहनांवर बसविणेस मनाई आहे.
6. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 92 नुसार वरील तरतूदींचे पालन न करणारे वाहन सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी आणण्यास मनाई आहे.
7. केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 106 नुसार सार्वजनिक रस्त्यावर एखाद्या वाहनांचे पुढील दिव्यांचा प्रकाशझोत पुढील दिव्यापासून 8 मीटर्सपेक्षा जास्त अंतरावर जाऊन पुढील व्यक्तीचे डोळे दिपवेल असा असणार नाही असे निर्बंध नमूद करण्यात आले आहेत. तसेच दिव्याची रचना ही एखाद्या व्यक्तीचे डोळे दिपणार नाहीत अशा प्रकारे असणे आवश्यक आहे. शहरामध्ये प्रत्येक वाहन चालकांनी आपले वाहनांचा दिवा हाय बीमवर न ठेवता लो बीमवर ठेवणे आवश्यक आहे.
8. महाराष्ट्र मोटर वाहन नियम, 1989 च्या नियम क्र. 235 नुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकाने कोणत्याही व्यक्तीचे डोळे दिपून तीला धोका होईल किंवा गैरवाजवी गैरसोय होणार नाही अशा प्रकारे आपले वाहनांच्या दिव्याचा प्रकाशझोत असणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू शकतो काय ?
महाराष्ट्र मोटर व्हेइकल रूल्स,1989 च्या नियम क्र. 250(ए) नुसार कोणताही वाहन चालक वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करून शकत नाही.

वाहन चालविताना फोनचे हॅन्ड्सफ्री कीट किंवा अन्य साधने वापरू शकतो काय ?
नाही. सदरचा नियम हा वाहन चालक व रस्त्याचा वापर करणारे इतर यांचे जीवीताच्या सुरक्षीततेकरीता करण्यात आला असून वाहन चालकाचे लक्ष विचलीत झाल्यास अपघात घडू शकतो त्यामूळे वाहन चालकांनी वाहन चालवितांना आपला मोबाईल फोन बंद ठेवणे योग्य आहे.
अत्यंत तातडीचे वेळी वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करता येतो काय ?
नाही. महाराष्ट्र मोटर व्हेइकल रूल्स,1989 च्या नियम क्र. 250(ए) नुसार कोणताही वाहन चालक वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करून शकत नाही. यामधून कोणालाही अपवाद करण्यात आलेले नाही.

अपघात घडल्यानंतर वाहन चालकाचे कर्तव्य काय आहे ?
मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 च्या कलम 134 प्रमाणे एखादे मोटर वाहन ज्या अपघातामध्ये गुंतले असेल आणि त्यामूळे एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचली असेल तर त्या वाहनाचे चालकाने किंवा वाहन ताब्यामध्ये असलेल्या व्यक्तीने खालीलप्रमाणे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.
1. सर्वात जवळच्या वैद्यक व्यवसायिकाकडे किंवा रूग्णालायामध्ये जखमी व्यक्तीला नेऊन वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे.
2. जवळच्या पोलीस स्टेशनला 24 तासाचे आत अपघाताची खबर देणे.
3. विम्याचे प्रमाणपत्र संबंधित विमाकाराला अपघात घडल्यासंबंधीची माहिती लेखी स्वरूपामध्ये पुरविणे.

पार्कींगचे नियम काय आहेत ?
रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन, 1989 च्या नियम क्र. 15 प्रमाणे खालील नमूद ठिकाणी वाहने पार्कींग करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
1. रस्त्यांचे क्रॉसींगवर, चौकामध्ये, वळणावर, हिलटॉपवर किंवा हम्पबॅक ब्रीजवर किंवा त्याजवळ
2. फुटपाथवर
3. पेडेस्ट्रीअन क्रॉसींगवर किंवा सिग्नल लाईटजवळ
4. कोणत्याही मुख्य रस्त्यावर किंवा वेगवान वाहतूकीकरीता असलेल्या रस्त्यावर
5. दुसऱ्या वाहनाला अडचण करील अशाप्रकारे किंवा दुसरे वाहनांचे विरूध्द बाजूस
6. डबल पार्कींग
7. वाहतूकीच्या प्रवाहाचे विरूध्द बाजूस
8. बस स्टॉपच्या दोन्ही बाजूस 15 मीटर्स अंतरापर्यंत
9. कोणत्याही आस्थापनेच्या प्रवेशद्वारासमोर
10. फुटपाथ सुरू होतो व संपतो त्याठिकाणी
11. वाहतूकीची चिन्हे झाकली जातील अशा ठिकाणी
12. ज्याठिकाणी वाहन पार्कींग करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत अशा ठिकाणी
– उपरोक्त क्र.1 ते 11 मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी स्वतंत्रपणे नो पार्कींगचे फलक लावण्याची आवश्यकता नाही.

धोकादायकरित्या वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर काय कारवाई करण्यात येते ?
धोकादायकरित्या वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 कलम 184 प्रमाणे कारवाई करण्यात येते. अशा वाहन चालकांमूळे त्यास स्वत:चे व रस्त्याचे वापर करणारे इतरांचे जीवीत व मालमत्तेला होणाऱ्या धोक्यामूळे त्याचेकडून रू. 500/- ची तडजोड रक्कम वसूल करून त्याचे ड्रायव्हींग लायसन्स ताब्यामध्ये घेऊन मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 चे कलम 19 प्रमाणे रद्द किंवा निलंबीत करण्याकरीता संबंधति प्राधकिरणाकडे पाठविण्यात येते. तसेच आवश्यकता भासल्यास वरील कारवाईऐवजी त्याचेविरूध्द संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यास अटक करून न्यायालयीन कार्यवाही करण्यात येते.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कोणती कारवाई करण्यात येते ?
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 कलम 185 प्रमाणे कारवाई करण्यात येते. अशा वाहन चालकांची सरकारी रूग्णालयामध्ये किंवा वाहतूक पोलीसांकडे असलेल्या ब्रीथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात येऊन त्यांनी मद्यार्काचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरूध्द संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यास अटक करून न्यायालयीन कार्यवाही करण्यात येते. तसेच त्याचे ड्रायव्हींग लायसन्स ताब्यामध्ये घेऊन मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 चे कलम 19 प्रमाणे रद्द किंवा निलंबीत करण्याकरीता संबंधित प्राधकिरणाकडे पाठविण्यात येते.

पोलीस वाहन कधी अटकावून ठेवू शकतात ?
मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 207 नुसार खालीलप्रसंगी वाहतूक पोलीस एखादे वाहन अटकावून ठेवू शकतात.
1. नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना इत्यादीशिवाय वाहन चालविताना आढळून आल्यास
2. ड्रायव्हींग लायसन्स नसताना वाहन चालविताना आढळून आल्यास
3. अवैध प्रवासी वाहतूक करून वाहन चालविताना आढळून आल्यास
तसेच गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले, अपघात केलेले किंवा मालकीबाबत संशय असलेले वाहन अटकावून ठेवू शकतात. असे अटकावून ठेवलेले वाहन सोडविण्याकरीता वाहनाशी संबंधीत असलेले सर्व मूळ दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.

वाहन टोईंग कधी केले जाते ?
वर नमूद केल्याप्रमाणे रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन, 1989 च्या नियम क्र. 15 प्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी किंवा वाहतूकीच्या प्रवाहास अडथळा होईल अशाप्रकारे वाहन उभे करून वाहन चालक उपलब्ध नसल्यास वाहन टोईंग करण्यात येते.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून दंड घेण्याचे अधिकार कुणाला आहेत ?
वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक व त्यावरील दर्जाचे अधिकारी मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 200 प्रमाणे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून तडजोड शुल्क जी.इ.एन. पावतीद्वारे वसूल करण्याचे अधिकार आहेत. पोलीस शिपाई व पोलीस हवालदार दर्जाचे अधिकारी वाहतूक नियमभंगाबाबत L-tem कारवाई करतात. अशावेळी वाहन चालकांनी जवळच्या ट्राफिक अधिकाऱ्याकडे किंवा  ट्राफिक डिविजन मध्ये तडजोड रक्कम भरू शकतात.

वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्काचे पुढे काय केले जाते ?
मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 200 प्रमाणे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून जी.इ.एन. पावतीद्वारे वसूल करण्यात आलेले तडजोड शुल्क तात्काळ शासनाचे कोषागारामध्ये भरण्यात येते.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामूळे घेण्यात आलेली दंड रक्कम परत मिळू शकते काय ?
नाही. वाहतूक पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक व त्यावरील दर्जाचे अधकिारी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना त्याने केलेल्या वाहतूक नियमाचे उल्लंघनाबद्दल मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 200 प्रमाणे महाराष्ट्र शासनाचे 4 जुन 2007 व 4 ऑगस्ट,2009 अन्वयेच्या राजपत्रामध्ये र्निधारीत करण्यात आलेली तडजोड शुल्क वसूल करीत असतात. अशावेळी त्याबाबत निर्णय जागीच होत असल्यामूळे सदरची रक्कम परत दिली जात नाही.

जर दंडाची रक्कम भरावयाची नसेल तर काय कार्यपध्दती आहे ?
वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 200 प्रमाणे महाराष्ट्र शासनाचे 4 जुन 2007 व 4 ऑगस्ट,2009 अन्वयेच्या राजपत्रामध्ये र्निधारीत करण्यात आलेली तडजोड शुल्क एखाद्या वाहन चालकांस वाहतूक शाखेमध्ये भरावयाची नसेल तर त्याकरीता खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबविण्यात येते.
संबंधति वाहन चालकांनी आपले मूळ ड्रायव्हींग लायसन्स वाहतूक पोलीसांकडे जमा करून त्या बदल्यामध्ये महाराष्ट्र व्हेईकल रूल्स 1989 च्या नियम क्रमांक 14 प्रमाणे पावती (L.tem.)  घ्यावी. सदर पावतीचा उपयोग तात्पुरते ड्रायव्हींग लायसन्स म्हणून पुढील 15 दिवसांकरीता करता येतो.
वाहतूक शाखेकडून 15 दिवसांनंतर ड्रायव्हींग लायसन्ससह संबंधति वाहन चालकाविरूध्द न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येतो. त्यानंतर पुढील न्यायालयीन कारवाई सुरू होते.

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसांना कागदपत्रे तपासण्याचे अधिकार आहेत काय ?
होय.
कायद्याप्रमाणे कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही दर्जाच्या वाहतूक पोलीसांना कागदपत्रे तपासण्याचा अधिकार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये पोलीस उप आयुक्त, वाहतूक यांचेकडून  वाहन चालकांची गैरसोय होऊ नये व विनाकारण वेळ वाया जाऊ नये याकरीता कागदपत्र तपासणीकरीता विशेष आदेश प्राप्त झाल्याशिवाय किंवा वाहनांचे नोंदणीबाबत अथवा मालकीबाबत वाजवी संशय आल्याशिवाय वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांशिवाय इतर वाहन चालकांची कागदपत्रे तपासू नयेत असे आदेश पारित करण्यात आले आहेत.

दुचाकी वाहन चालक व पाठीमागील बसलेल्यांकरीता हेल्मेट परीधान करण्याचे काय नियम आहेत ?
मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 129 प्रमाणे दुचाकी वाहनावरील चालक व पाटीमागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे बंघनकारक करण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास मोटर व्हेइकल अॅक्ट, 988 चे कलम 177 प्रमाणे रू.100/- तडजोड शुल्क वसूल करण्याची तरतूद आहे.

सिग्नल सुरू ठेवण्याच्या वेळा कोणत्या निकषावर निश्चीत करण्यात आल्या आहेत ?
शहरातील सिग्नल सुरू ठेवण्याच्या वेळा निश्चीत करताना वाहतूकीच्या प्रवाहाचा विचार करण्यात आला असून ज्यावेळी सिग्नल चौकामध्ये वाहतूकीचे प्रमाण जास्त असते त्यावेळी सिग्नल दिवे सुरू ठेवले जातात. इतर वेळी ब्लिकर्स सुरू ठेवण्यात येतात. पुणे आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या सिग्नलच्या वेळा वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता चौकामध्ये दिवसांचे वेगवेगळ्या वेळी असलेल्या वाहतूक प्रवाहाप्रमाणे निश्चीत करण्यात आलेल्या आहेत.

फुटपाथवरील व रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्याचे अधकिार कोणाला आहेत ?
फुटपाथवरील व रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्याचे व फेरीवाले, विक्रेते यांचेवर कारवाई करण्याचे अधकिार संबंधति कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका किंवा कॅन्टोनमेंट बोर्ड) अतिक्रमण विभागास आहेत. तसेच यामध्ये आवश्यक कायदेशीर कारवाई संबंधति कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडून करण्यात येते. फुटपाथवर वाहन पार्कींग केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येते.

रिक्षा चालकांनी भाडे नाकारले किंवा जास्त भाड्याची मागणी केली तर तक्रार कशी नोंदविता येईल ?
रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. तथापी अशा प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून नागरीकांच्या सुविधेसाठी रिक्षा तक्रार पुस्तिका तयार करण्यात आली असून ती प्रत्येक वाहतूक विभागामध्ये व वाहतूक पोलीसांकडे देण्यात आली आहे. त्याद्वारे आपण आपले नांव, पत्ता, संपर्क क्रमांक व रिक्षाची माहिती यासह तक्रार दाखल करू शकता. त्याबाबत वाहतूक पोलीसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलीसांकडून सदरची तक्रार संबंधति प्रादेशिक परिवहन विभागाकडे कायदेशीर कारवाईकरीता पाठविण्यात येते. तसेच वाहतूक नियंत्रण कक्षाचे 020 / 26123520 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार देता येईल.
किंवा आपण थेट प्रादेशिक परिवहन विभागामध्ये खालीलप्रमाणे तक्रार नोंदवू शकता.
पुणे : दुरध्वनी क्र. 020 / 26051414 फॅक्स क्र. 020 / 26058282 ई -मेल rtopune@dataone.in
पिंपरी चिंचवड÷ : दुरध्वनी क्र. 020 / 27492828
एसएमएस सेवा : 9420218338 / 59994
RTOPUNE (space) AUTORICKSHAW(space) nature of complaint (space)place, date, time

वाहनांचे पी.यु.सी. प्रमाणपत्राबाबत कोणती कार्यवाही करण्यात येते ?

सेंट्रल मोटर व्हेइकल रूल्स, 1989 चे नियम क्र. 115 व 116 प्रमाणे प्रत्येक मोटर वाहनाकरीता पी.यु.सी.प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रदुषण करणारे वाहन आढळुन आल्यास वाहतूक पोलीसांकडून कायदेशीर  कार्यवाही करण्यात येते.
एखाद्या वाहनचालकाकडे तपासणीचे वेळी पी.यु.सी. प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस उप निरीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याने वाहन चालकास सात दिवसांचे आत पी.यु.सी.प्रमाणपत्र सादर करण्याबाबत लेखी नोटीस दिली पाहीजे. त्याप्रमाणे वाहन चालकाने सदर मुदतीमध्ये पी.यु.सी.प्रमाणपत्र संबंधति अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. त्यामध्ये चुकल्यास तपासणी करणारा अधकिारी ती बाब नोंदणी करणाऱ्या  प्राधकिरणास कळविल आणि संबंधति वाहनचालक हा मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 चे कलम 190(2) प्रमाणे कारवाईस पात्र होईल.

Footpath:http://www.facebook.com/photo.php?fbid=10150096091524207&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=10150100767582696&set=o.148036915234615&theater
Numberplate:http://www.facebook.com/topic.php?uid=148036915234615&topic=983
http://www.facebook.com/photo.php?fbid=1884166823532&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=182003451810378&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=1592717585494&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=186557204701010&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=190332707667300&set=o.148036915234615&theater

http://delhitrafficpolice.nic.in/number-plate-style.htm
Right NumberPlate:http://delhitrafficpolice.nic.in/number-plate-style.htm

http://www.facebook.com/photo.php?fbid=171798182858488&set=a.168909793147327.32355.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=171798182858488&set=a.168909793147327.32355.148036915234615&theater

Action regarding unclaimed vehicle:http://www.facebook.com/topic.php?uid=148036915234615&topic=990

No-parking:http://www.facebook.com/photo.php?fbid=10150103277322427&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=146662005388232&set=o.148036915234615&theater

Traffic Jam:http://www.facebook.com/photo.php?fbid=124816020911186&set=o.148036915234615&theater

Cycle track:http://www.facebook.com/photo.php?fbid=163917513645018&set=o.148036915234615&theater
TANKAR:http://www.facebook.com/photo.php?fbid=1780535666615&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=1785192023021&set=o.148036915234615&theater
OTHER:http://www.facebook.com/photo.php?fbid=1291759951216&set=o.148036915234615&theater

LOGO ON VEHICLE

http://www.facebook.com/photo.php?fbid=165802390136890&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=105953179483862&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=187701901269313&set=o.148036915234615&theater

http://www.facebook.com/photo.php?fbid=195209810506687&set=o.148036915234615&theater

PARKING:http://www.facebook.com/photo.php?fbid=206633142685000&set=o.148036915234615&theater

Source

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

TechEggs
Logo